Posts

Showing posts from May, 2021

आपली गरज प्रदुषणाचे कारण

 आपल्या दैनंदिन कारणासाठी आपण काहीनाकाही विकत घेत असतो. खरेदीच्या माध्यमातून आपण पर्यावरणाला कचरा भेट म्हणून देतो. श्वास घेऊन कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो अगदी तसाच कचरा आपण निर्माण करतो. कार्बन डाय ऑक्साईड झाडांची गरज ठरतो पण खरेदीतून निर्माण झालेला कचरा कोणाची गरज ठरतो? बाजारातील कंपन्या आपल प्रॉडक्ट युजफुल करण्यापेक्षा ते अट्रॅक्टीव्ह बनवतात. त्या प्रॉडक्टच्या अट्रॅक्टीव्हनेस मधूनच चिरकाळ टिकणारा कचरा निर्माण होतो. मेट्रोपॉलिटन, कॉस्मोपॉलिटन शहरांचा चकचकीत भाग पहाण्यापेक्षा त्या शहरांचे डंपिंग यार्ड नक्की बघा. आपण उर्जा स्त्रोतांची निर्मिती थांबवू शकत नाही पण आपण त्याला मर्यादा तर आणु शकतो. भाजी, फळे, कपडे विकत घेताना आपण प्लास्टिकच्या बॅग्ज प्लास्टीक वेश्टन तर नाकारू शकतो. विज उपकरणांच्या वापराला आळा घालून विजेचा अपव्यय टाळू शकतो. एकासाठी एक कार पेक्षा विस लोकांसाठी एका बसचा वापर करू शकतो. जगभरात फेकण्यात जाणाऱ्या अन्नाच प्रमाण अन्न उत्पादनाच्या एक त्रुतियांश आहे. या एवढ्या मोठ्या अन्न नासाडीची कारणे भिन्न आहेत. सप्लाय चेन मध्ये केली जाणारी हेळसांड, प्रॉपर रेफ्रिजरेटर्सच्या ...